MSRTC New Big Update 1 ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास आता बंद होणार, लवकर हे काम करा

MSRTC New Big Update नमस्कार मित्रांनो, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय 65 वर्षे ते 75 वर्षे असेल. किंवा 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एसटी बसमध्ये सवलतीचा लाभ घेत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा. कारण की सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड काढावे लागणार आहे हे आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग बांधव,शालेय विद्यार्थी राज्य शासनाने विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध प्रकारच्या समाज घटकांना एसटी बसच्या प्रवासा भाड्या मध्ये आहे तसेच दिनांक 23 8 2022 रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये महाराष्ट्रात किंवा राज्यातील 75 वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे तसेच 65 वर्ष ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50 टक्के प्रवास सवलत देण्यात आली आहे.read more

MSRTC New Big Update त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते आणि शासनाकडून सुद्धा जीआर काढण्यात आला होता या सवलत धारकांना एसटी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते आणि हे स्मार्ट कार्ड धारकांना देण्यासाठी एसटी मध्ये महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आला होता परंतु आता हा करार गेल्या आठ नऊ महिन्यापासून संपला आहे आणि हा करार संपल्यामुळे राज्यभरात स्मार्ट कार्ड ची नोंदणी बंद झाली आहे आणि नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा बंदच पडली आहे.

म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात विशेष सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड दाखविणे बंधनकारक आहे एसटी महामंडळतर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे आणि आता जोपर्यंत स्मार्ट कार्डच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आता ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मध्येच लाभ घेण्यासाठी आपल आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे आणि स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

जर तुम्ही पन्नास टक्के लाभ घेत असाल तर त्या आधार कार्ड वरती तुमचे वय 65 वर्षे ते 75 वर्ष दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही 75 वर्षाच्या पुढचा लाभ घेत असाल तर प्रवासाचा लाभ घेत असाल तर आधार कार्ड वरती तुमचे वय 75 वर्षाच्या पुढे असायला पाहिजे तरच तुम्हाला एसटी महामंडळामध्ये विशेष सवलतीचे लाभ दिले जाणार आहेत स्मार्ट कार्ड ची नोंदणी किंवा नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड पुन्हा बंद केली जाईल आणि स्मार्ट कार्ड वापरले जाईल.

Leave a Comment

Close Help dada