Viral Video शिकार करो या शिकार बनो’ ५० माकडांनी केला बिबट्याचा मोठा गेम

Viral Video जंगलात फक्त तेच प्राणी टिकतात, जे बलवान असतात किंवा जे एकत्र राहतात. एकीचं बळ असले तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, ही म्हण खरी असल्याचे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये माकडांच्या संपूर्ण कळपाने मिळून एका माकडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला धडा शिकवला असून बिबट्याला पळवून पळवून मारलं असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Viral Video दक्षिण आफ्रिकेतील ग्रामीण भागात ही घटना घडली असल्याची माहिती आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला एक बिबट्या रस्त्याच्या किनारी चालताना दिसत आहे. बिबट्या यावेळी शिकारीच्या शोधात होता, असे यावरुन लक्षात येते. तेवढ्यातच रस्त्याच्या मधोमध माकडांचा एक मोठा कळप चालताना दिसत आहे. माकडं दिसल्यानंतर बिबट्याला आपल्याला शिकार सापडल्याचा आनंद होतो. यानंतर बिबट्या त्यांच्याकडे धावत सुटतो आणि एका माकडावर जोरदार हल्ला करतो. हा बिबट्या चक्क माकड्यांच्या टोळीत शिरून शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला हे माहिती नव्हतं की, त्याला चांगला धडा शिकविला जाणार आहे आणि लगेचच तब्बल ५० माकडांनी मिळून या बिबट्याचाच गेम केला.Viral Video

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वांनीच या माकडांच्या एकजूटीचं कौतुक केलं आहे. “याला म्हणतात एकीचं बळ”, हे या माकडाच्या कळपांनी सिध्द करुन दाखविलं आहे.

Leave a Comment

Close Help dada