किचनमध्ये बारीक झुरळं खूप झालीत? २ भन्नाट घरगुती उपाय-२ वर्ष एकही झुरळ येणार नाही..| viral video..!

किचनमध्ये बारीक झुरळं खूप झालीत? २ भन्नाट घरगुती उपाय-२ वर्ष एकही झुरळ येणार नाही..| viral video..!

घराच्या कोपऱ्यांमध्ये, किचनमध्ये झुरळ दिसणं सामान्य आहे पण जेव्हा वारंवार या झुरळांकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा हीच झुरळं आजार पसरण्याचं कारण ठरू शकतात. (Easy And Quick Home Remedies For Cockroaches) किचनमध्ये रात्रीच्यावेळी बारीक झुरळं तयार होतात आणि घरभर पसरतात किंवा घरातल्या कोणत्याही ठिकाणी बऱ्याचवेळापासून उष्टे अन्न पडले असेल तर मोठ्या प्रमाणात झुरळं तयार होतात. झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. हा उपाय केल्यास जवळपास १ ते २ वर्ष घरात झुरळं फिरकणार नाहीत. (How to Remove Cockroaches From House)viral video..!

झुरळांना पळवण्याचा खास घरगुती उपाय

एक कागद घ्या आणि त्याचे लहान लहान तुकडे करा. तुमचं घर किती मोठे आहे किंवा घरात किती झुरळं आहेत यानुसार कागदाचे तुकडे करून घ्या. एका वाटीत २-३ चमचे साखर घ्या किंवा गूळ बिस्किट्स असे पदार्थ घेऊ शकता. हे पदार्थ विषारी नसतात पण या पदार्थांमुळे झुरळं आकर्षीत होतात. बोरीक पावडर तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळेल. बोरीक पावडरमुळे झुरळांना दूऱ पळवण्यास मदत होते.

घरात किती झुरळं आहेत यानुसार याचे प्रमाण कमी जास्त करा. बोरीक पावडरमध्ये आणि साखरेच्या मिश्रणात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. कागदाच्या तुकड्यांवर चमच्याने हे मिश्रण भरा आणि वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये ठेवा. खासकरून रात्रीच्यावेळी किंवा दुपारच्यावेळी ठेवा. हे खाल्ल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटणार नाही आणि थोड्याच वेळात गुदमरून मरून जातील.

झुरळ दूर पळवण्यासाठी दुसरा घरगुती उपा

सगळ्यात आधी एका वाटीत अर्धा ग्लास पाणी घाला त्यात कांदे घाला. त्यात कडुलिंबाची पानं घाला. कडुलिंबाने बॅक्टेरियाज कमी होण्यास मदत होते. पाणी गरम करून त्यात सर्व पदार्थ घाला. हे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. नंतर ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. झुरळं ज्या ठिकाणी असतात ज्या ठिकाणी स्प्रे मारा. यामुळे झुरळं मरून जाण्यास मदतहोईल.viral video..!

Leave a Comment

Close Help dada